सुविचार संग्रह व म्हणी


मराठी सुविचार
•पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.
•श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)
•विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)
•प्रसंगावधान महत्त्वाचे.
•जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखादेठात मधाने भरलेला असतो.
•कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)
•जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)
•सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)
•समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
•पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.
•यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.
•हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.
•आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा !
•मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.
•दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.
•मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.
•मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.
•कष्टाने पैसा मिळवावा.
•सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.
•स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.
•शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.
•देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.
•नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.
•स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.
•जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.
•ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.
•कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.
•काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.
•अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.
•झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.
•जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.
•शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)
•समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.
•शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.
•अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.
•राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.
•आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.
•मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.
•व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
•सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.
•चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
•कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
•दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.
•प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

म्हणी
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6.अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
7.नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
8. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
9. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
10.अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
11.छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
12. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
13.दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
14.नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
15.एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
16.वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
17.रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
18.अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
19.शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
20.नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
21. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
22.आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
23.कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
24.आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
25.काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
26.झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
27.पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
28. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
29.कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
30.कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
31.गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
32.घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
33.डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
34. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
35.वरातीमागून घोडे –दी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
36.पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
37.खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
38.तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
39.नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
40.हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
41.कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
42.गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
43.टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही
44. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे
45. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
46. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट
47.आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
48.आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार.
49.आधी पोटोबा मग विठोबा.
50.आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास.
51.आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
52.आपला तो बाळू दुसऱ्याचा तो कार्टा.
53.आपला हात जगन्नाथ.
54.आपलेच दात आणि आपलेच ओठ.
55.आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार.
56.आयत्या बिळात नागोबा.
57.आयत्या पिठावर रेघोट्या.
58.आलीया भोगासी असावे सादर.
59.आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.
60.आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
61.आधी लगीन कोंढाण्याचं.
62.आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.
63.आपलंच घर आणि हगून भर.
64.आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
65.आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.
66.आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.
67.आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा
68.आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
69.आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
70.आधणातले रडतात, सुपातले हसतात
71.आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
72.आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
73.आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
74.आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.
75.इकडे आड, तिकडे विहीर.
76.ईडा पीडा टळो,बळीचे राज्य येवो.
77.उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.
78.उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.
79.उथळ पाण्याला खळखळाट फार.
80.उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.
81.उघडीला भेटले लुगडे, मग हे झाकू की ते झाकू.
82.ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
83.ऊसाच्या पोटी काऊस
84.एक घाव दोन तुकडे.
85.एक ना धड भाराभर चिंध्या.
86.एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.
87.एकादशीच्या घरी शिवरात्र.
88.एका कानावर पगडी, घरी बाई उघडी.
89.एकटा जीव सदाशिव.
90.एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ|
91.एकाने गाय मारली म्हणून दुसर्याघने वासरू मारू नये.
92.ऐकावे जनाचे करावे मनाचे.
93.ऐट राजाची अऩ वागणूक खेकड्यांची.
94.ऐन दिवाळीत दाढदुखी.
95.औट घटकेचे राज्य.
96.औषधा वाचून, खोकला गेला.
97.अंथरूण पाहून पाय पसरावेत.
98.अंगावर आल्या गोणी, तर बळ धरले पाहिजे तुनी.
99.अंधेर नगरी चौपट राजा.
100.ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
101.ऋषी पंचमीचा बैल.
102.ऋण काढून तूप प्यावे.
103.कानामागून आलीअन तिखट झाली
104.कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.
105.कळते पण वळत नाही.
106.कर नाही त्याला डर कशाला?
107.करावे तसे भरावे.
108.करायला गेले नवस आज निघाली अवस
109.काळ आला होता पण वेळ नाही.
110.काखेत कळसा गावाला वळसा.
111.कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी.
112.कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ.
113.कुर्हाबडीचा दांडा गोतास काळ.
114.कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
115.कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.
116.क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
117.कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
118.कशात काय अन फाटक्यात पाय.
119.केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
120.करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
121.कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी?
122.केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे.
123.काम नाही घरी अन् सांडून भरी.
124.कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला.
125.कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
126.काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
127.काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
128.कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.
129.कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
130.कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
131.कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
132.कोल्हा काकडीला राजी.
133.कंड भारी उड्या मारी.
134.काना मागुन आली तिखट झाली.
135.कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
136.कळना ना वळना, भाजी भाकरी गिळना.
137.कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये.
138.काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.
139.खाई त्याला खवखवे.
140.खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.
141.खाणा-याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
142.खायला काळ भुईला भार.
143.खायला कोंडा अन निजेला धोंडा.
144.खाली मुंडी, पाताळ धुंडी.
145.खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
146.खिशात नाय जाट पण इस्त्री मात्र ताठ
147.गरज सरो,वैद्य मरो.
148.गरजवंताला अक्कल नसते.
149.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खल्ली.
150.गवयाचं पोर सुरात रडतं.
151.गाढवाला गुळाची चव काय?
152.गाढवी प्रेम अन लाथांचा सुकाळ
153.गाता गळा, शिंपता मळा.
154.गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.
155.गुलाबाच्या झाडाला वडाचा पार, आन वासराच्या पाठीवर नांगराचा भार
156.गुलाबाचे काटे, तसे आईचे धपाटे.
157.गुरूची विद्या गुरूस फळली.
158.गोगल गाय पोटात पाय.
159.घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात.
160.घरोघरी मातीच्या चुली.
161.घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं.
162.घर पाहावं बांधून.
163.घरात नाही दाणा तरी मला बाजीराव म्हणा.
164.घर पाहवं बांधून आणि लग्न पहावं करुन.
165.घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा.
166.घोडा मैदान जवळच आहे.
167.घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं
168.घर ना दार देवळी बिर्हाशड.
169.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
170.चार सुगरणी तरी सैपाक अळणी
171.चोर सोडून सन्याश्याला फाशी.
172.चोराच्या उलट्या बोंबा.
173.चोराच्या मनात चांदणे.
174.चोराच्या हातची लंगोटी.
175.चिलटांची लढाई आणि नुसती बडाई.
176.छडी लागे छमछम विद्या येई घमघम.
177.जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
178.जगाच्या कल्याणा संताची विभुती.
179.जनाची नाही तरी मनाची तरी जरा.
180.जनात बुवा आणि मनात कावा.
181.जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
182.जामात दशम ग्रह.
183.जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
184.जलात राहून माशाशी वैर कशाला?
185.जळतं घर भाड्याने कोण घेणार?
186.जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.
187.जशास तसे.
188.जशी कामना तशी भावना.
189.जशी देणावळ तशी धुणावळ.
190.जशी नियत तशी बरकत.
191.जसा गुरु तसा चेला.
192.जसा भाव तसा देव.
193.जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.
194.जातीसाठी खावी माती.
195.जात्यातले रडतात सुपातले हसतात.
196.जात्यावर बसले की ओवी सुचते.
197.जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
198.जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
199.जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
200.जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
201.जावयाचं पोर हरामखोर.
202.जावा जावा आणि उभा दावा.
203.जावा जावा हेवा देवा.
204.जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
205.जिकडे सु‌ई तिकडे दोरा.
206.जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
207.जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
208.जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
209.जिथे कमी तिथे आम्ही.
210.जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
211.जुनं ते सोनं नवं ते हवं.
212.जुने ते सोने.
213.जे न देखे रवि ते देखे कवी.
214.जे पिंडी ते ब्रम्हांडी.
215.जे फुकट ते पौष्टीक.
216.जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
217.जेथें नगाऱ्याची घाई तेथें टिमकी काय जाई
218.जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
219.जो गुण बाळा तो जन्म काळा.
220.जो नाक धरी, तो पाद करी.
221.जो श्रमी त्याला काय कमी.
222.जोकून खाणार, कुंथुन हागणार.
223.जोवरी पैसा तोवरी बैसा.
224.ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
225.ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
226.ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
227.ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
228.ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
229.ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
230.ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी.
231.ज्याची दळ त्याचे बळ.
232.ज्याचे करावे भले, तो म्हणतो आपलेच खरे.
233.ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपो‌आप.
234.ज्याच्या हाती ससा तो पारधी.
235.ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
236.ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
237.ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
238.ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा.
239.ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
240.झालं गेलं गंगेला मिळालं.
241.झोपून हागणार उठून बघणार
242.झाकली मुठ सव्वा लाखाची
243.टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
244.टाळी एका हाताने वाजत नाही.
245.ठकास महाठक.
246.ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला.
247.ढुंगणाला नाही लंगोटी आणि मला म्हणा दिपुटी.
248.तळे राखील तो पाणी चाखील.
249.तुपात तळले, साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच.
250.तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचुन करमेना.
251.तेलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणे.
252.ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
253.त वरून ताकभात.
254.तेरड्याचा रंग तिन दिवस.
255.तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्याे झाल्या हरण्या.
256.तुला न मला घाल कुत्र्याला
257.तवा खातो भाकर चुल्हा भुकेला, पोहरा पितो पाणी रहाट तहानलेला
258.तोंड दाबून बुक्क्यांचा मार
259.तेलजीचं तेल जळे मशालजीची --ड जळे.
260.थेंबे थेंबे तळे साचे.
261.थांबला तो संपला.
262.दगडापेक्षा वीट मऊ.
263.दाम करी काम.
264.दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत.
265.दिव्याखाली अंधार.
266.देखल्या देवा दंडवत.
267.देव तारी, त्याला कोण मारी.
268.देवाची करणी आणि नारळात पाणी.
269.देश तसा वेष, राजा तशी प्रजा.
270.दैव देते आणि कर्म नेते.
271.दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो.
272.दुसर्यापच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
273.दुभत्या गायीच्या लाथा गोड.
274.दूरून डोंगर साजरे.
275.दुष्काळात तेरावा महिना.
276.दोघांचे भांडण तिसर्यााचा लाभ.
277.दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
278.दिवस गेला उटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
279.दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
280.दुःख रेड्याला न डाग पखालीला.
281.दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.*
282.दृष्टी आड सृष्टी.
283.देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
284.दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
285.देणं न घेणं आणि कंदील घेऊन येणं.
286.दिवस गेला उठारेटी चांदण्याचे पोहे कुटी.
287.दीड दिवसात अन कोल्हं उसात.
288.देह देवळात अन चित्त पायताणात.
289.देवाघरचा पवा वाजतो कवा कवा.
290.दे दान सुटे गिऱ्हाण.
291.दे गा हरी पलंगावरी।
292.धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.
293.न खाणार्याव देवाला नैवेद्य.
294.नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
295.नकटे असावे पण धाकटे असू नये.
296.नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा.
297.नावडतीचं मीठ अळणी.
298.नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.
299.निंदकाचे घर असावे शेजारी.
300.न्हाणीला बोळा अन् दरवाजा मोकळा.
301.नाकापेक्षा मोती जड.
302.नाक नाही धड अन् तपकीर ओढ
303.नवर्याहने मारलं आणि पावसाने झोडपलं तरी तक्रार कुणाकडे करायची?
304.न कर्त्याचा वार शनिवार.
305.नरो वा कुंजरो.
306.नव्याची नवला‌ई.
307.नव्याचे न‌ऊ दिवस.
308.नाकपेक्षा मोती जड.
309.नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
310.नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
311.नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.
312.नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
313.नाव गंगुबा‌ई अऩ तडफडे तहानेने.
314.नाव मोठे लक्षण खोटे.
315.नेमीच येतो मग पावसाळा
316.नाज़ुक नार चाबकाचा मार
317.नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा
318.निजुन हागायचं आणि उठुन बघायचं.
319.नाक कापले तरी दोन भोके आहेत.
320.नाचता येईना अंगण वाकडे अन रांधता येईना ओली लाकडे.
321.न कर्त्याचा वार शनिवार.
322.न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
323.नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.
324.नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.
325.नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
326.नमनाला घडाभर तेल.
327.नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.
328.नवरा नाही घरी सासरा जांच करी.
329.नवा कावळा शेण खायला शिकला.
330.नव्याची नवला‌ई.
331.ना घरचा ना घाटचा.
332.नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
333.नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
334.नांव गंगाबा‌ई, रांजनात पाणी नाही.
335.नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
336.नांव मोठे लक्षण खोटे.
337.नांव सगुणी करणी अवगुणी.
338.नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
339.नांव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा
340.नाकावर पदर अन विशीवर नजर.
341.नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा‌ई प्राण.
342.नारो शंकराची घंटा.
343.नालासाठी घोडं.
344.नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.
345.नाही चिरा, नाही पणती.
346.नाही निर्मल मन काय करील साबण.
347.निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
348.नेमेचि येतो मग पावसाळा.
349.नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
350.न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.
351.पदरी पडले आणि पवित्र झाले.
352.पळसाला पाने तीनच.
353.पडतील स्वाती तर पिकतील मोती.
354.पडत्या फळाची आज्ञा.
355.पडलो तरी नाक वर.
356.पहिले पाढे पंच्चावन्न.
357.पाण्यात राहून माशाशी वैर करु नये.
359.पाचामुखी परमेश्वर.
360.पादा पण नांदा.
361.पाचही बोटं सारखी नसतात.
362.पाटलाचं घोडं महाराला भुषण.
363.पाण्यात राहून माशाशी वैर?
364.पाण्यात म्हैस वर मोल.
365.पाण्यावाचून मासा झोपा घे‌ई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
366.पादऱ्याला पावट्याचे निमित्त.
367.पी हळद अन् हो गोरी..
368.पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
369.पुरूषाचे मरण शेती, बायकांचे मरण वेती.
370.पेरावे तसे उगवते.
371.पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम
372.पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करुन चालत नाही.
373.पंकज वर पाण्याचा मोती होतो.
374.प्रथमग्रासे मक्षिकापातः
375.प्रयत्नांती परमेश्वर.
376.प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे.
377.पाषाणाला पुरणपोळी, माणसाला शिळीपोळी (शिवीगाळी)
378.बळी तो कां पिळी
379.बैल गेला अन् झोपा केला.
380.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
381.बारा लुगडी तरी बाई उघडी.
382.बडा घर पोकळ वासा.
383.बळी तो कान पिळी.
384.बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
385.बाजारात तुरी भट भटणीला मारी.
386.बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
387.बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
388.बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.
389.बुडत्याचे पाय खोलात.
390.बुडत्याला काडीचा आधार.
391.ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
392.बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
393.बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
394.बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?
395.बाप तसा बेटा, संडास तसा लोटा
396.बाइल गेली अन सोपा केला.
397.भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
398.भरवशाच्या म्हशीला टोणगा.
399.भीक नको पण कुत्रा आवर.
400.भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
401.भुकेला कोंडा, निजेला धोंडा.
402.भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
403.भुकेच्या तापे करवंदीची कापे.
404.भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?
405.भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?
406.भुरट्याला तुरा, तर पोशिंद्याला धतुरा
407.मरावे परी कीर्तीरुपे उरावे.
408.मातीचे कुल्ले वाळले कि पडायचेच.
409.मन चिंती ते वैरीही न चिंती.
410.मनी वसे ते स्वप्नी दिसे.
411.मला नं तुला, घाल कुत्र्याला.
412.मला पहा अऩ फुले वहा.
413.महापुरे जेथे झाडे जाती, तेथे लव्हळी वाचती.
414.माकड म्हणतं माझीच लाल.
415.माकडाच्या हातात कोलीथ.
416.माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
417.माय मरो पण मावशी उरो.
418.मिया मुठभर, दाढी हातभर.
419.मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
420.मेल्या म्हशीला शेरभर दुध.
421.मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
422.मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही.
423.मोडेन पण वाकणार नाही.
424.मोह सुटेना अऩ देव भेटेना.
425.म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
426.म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
427.म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
428.मांडीखाली आरी अन चांभार पोरे मारी
429.माशीची धाव जखमेवर.
430.येरे माझ्या मागल्या.
431.यथा राजा तथा प्रजा.
432.येळला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
433.रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.
434.राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
435.राजा तशी प्रजा.
436.राजा बोले अऩ दल चाले.
437.राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?
438.रात्र थोडी अन् सोंग फार.
439.राव गेले पंत चढले
440.रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
441.रोज मरे त्याला कोण रडे.
442.रोज घालतंय शिव्या अन एकादशीला गातंय वव्या
443.रिकामा सुतार बायकोचे कुल्हे ताशी.
444.लंकेत सोन्याच्या विटा.
445.लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
446.लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
447.लहान तोंडी मोठा घास.
448.लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे.
449.लाखाचे बारा हजार.
450.लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
451.लेकी बोले सुने लागे.
452.लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
453.लगा लगा मला बघा.
454.वराती मागून घोडे.
455.वळ ऊठला पण संशय फिटला.
456.वाचेल तो वाचेल.
457.वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
458.वासरात लंगडी गाय शहाणी.
459.विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
460.वेळ ना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
461.वाळूत मुतलं फेस ना पाणी.
462.वाचाळ सासु, नाठाळ सून.
463.शहाण्याला शब्दाचा मार.
464.शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
465.शितावरून भाताची परीक्षा.
466.शिर सलामत तर पगड़ी पचास.
467.शेरास सव्वाशेर.
468.शेळी जाते जीवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी.
469.साखरेचे खाणार द्याला देव देणार.
470.साठी बुध्दी नाठी.
471.सात सुगरणी, भाजी अळणी.
472.साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
473.साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला.
474.सासू न सासरा जांच करे तिसरा.
475.सासू नाही घरी, नणंद जाच करी.
476.सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
477.सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
478.सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
479.सुंठेवाचून खोकला गेला.
480.सु‌ईण आहे, तो बाळंत हो‌ऊन घ्यावे.
481.सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.
482.सुख जवां एवढे दु:ख पर्वताएवढे.
483.सोन्याहून पिवळे.
484.स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.
485.सहा महिने नळकांडात घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
486.सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही.

No comments:

Post a Comment